मलनिस्सारण केंद्राच्या भिंतीखाली 15 वर्षीय मुलाचा बळी

fifteen year old boy dead under the wall of the drainage center
fifteen year old boy dead under the wall of the drainage center

उल्हासनगर - वडोल गावात असलेल्या मलनिस्सारण केंद्राची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली एका 15 वर्षीय मुलाचा बळी गेला असून मृत्यू झाला असून 3 जण किरकोळजखमी झाले आहेत. 

अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत असले तरी तरी सर्व नागरी सुविधा या उल्हासनगर महानगरपालिकाच्या वतीने पुरवल्या जात असलेल्या वडोल गावाजवळ अंबरनाथ नगरपरिषदेचे  मलनिस्सारण केंद्र आहे. या मलनिस्सारण केंद्राच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधलेली आहे. भिंतीला लागूनच अनेक झोपड्या बांधलेल्या आहेत. काल रात्रीपासून अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मध्यरात्री संरक्षक भिंत खचली आणि बाजूला असलेल्या झोपडीवर कोसळली. या घटनेत किरण घायवाट (15) वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे काका सूर्यकांत घायवाट व अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले. त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना समजताच उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, पाणी पुरवठा अभियंता कलाई सेलवन, मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मलनिस्सारण केंद्राची घरावर कोसळलेली भिंत काढली. किरणच्या वडिल चंद्रकांत यांचे निधन झालेले असल्याने त्याचे काका चंद्रकांत हे किरणचा सांभाळ करत होते. किरणच्या मृत्यूबद्दल नुकसान भरपाई रूपात त्याच्या नातलगांना आर्थिक मदत करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com