कोरोनाच्या लढतीत राष्ट्रीय बंजारा परिषद सरकारच्या मदतीला

कोरोनाच्या लढतीत राष्ट्रीय बंजारा परिषद सरकारच्या मदतीला

मुंबई - संपूर्ण देशभरात झपाट्याने वाढत असणाऱ्या कोरोना व्हायरसला आला घालण्यासाठी महाराष्ट्र शासन अतोनात प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय बंजारा परिषद देखील सरकारच्या मदतीला धावून आले आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेने लोधिवली (मुंबई), अक्कलकोट, बीड, पोहरागड (वाशीम), आणि अथणी (बेळगाव) या ठिकाणी कोरोना पेशंटच्या विलगीकरणासाठी ४० रूम उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनराव राठोड यांनी जाहीर केले आहे.

यामध्ये १० खोल्या पोलिस व १० खोल्या डॉक्टर तसेच नर्स यांच्यासाठी तर प्रत्येक ठिकाणचे २० रूम ह्या कोरोना पेशंटसाठी देण्यात आले आहेत. भक्तीधाम गोर धर्मपीठ, वाशिम येथे कोरोना पेशंट विलगीकरण सुरू देखील झाले आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेने सामाजिक बांधिलकी जपल्याचे समोर आले आहे.

राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते गोर प्रकाश राठोड यांनी महाराष्ट्र व परराज्यातील भक्तीधामचे पत्ते देखील उपलब्ध करून दिले आहेत.

1) भक्तिधाम - गोर धर्मपीठ, पोहरागड, वाशीम
2) गोर बंजारा ज्ञानपीठ, लोधिवली, मुंबई
3) शांतीस्थळ, अक्कलकोट, सोलापूर
4) सेवागड, बीड
5) हमूगड धाम, अथणी बेळगाव.

fight against corona rashtriya banjara parishad supports maharashtra government during corona crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com