COVID19 विरोधात आता 'महामोहीम'; मुंबई महानगरपालिकेने उचललं 'हे' मोठं पाऊल

COVID19 विरोधात आता 'महामोहीम'; मुंबई महानगरपालिकेने उचललं 'हे' मोठं पाऊल

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत आता "महाऑपरेशन' सुरू होणार आहे. महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांतील नागरिकांची तपासणी करण्यात येईल. ताप, सर्दी, खोकला व फ्लूसदृश आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तत्काळ चाचणी करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. 31) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत झाला. परदेशांतून 12 मार्चनंतर भारतात आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील व्यक्तींना सक्तीने क्वारंटाईन करण्याचाही विचार पुढे येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महापालिकेचे सहायक आयुक्त व उपायुक्तांशी संवाद साधला. या वेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते. कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्यामुळे वरळी कोळीवाडा परिसर सील करण्यात आला आहे. दहिसर येथील एक वस्ती आणि सोसायटी सील करण्यात आली आहे. गोरेगाव येथील बिंबिसार नगरही सील करण्यात आले आहे. दाट वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण आणणे अवघड होईल. मुंबईत लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे तपासणीसाठी महामोहीम हाती घेतली जाईल. महापालिकेचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस व राज्याच्या महसूल विभागाचे कर्मचारी यात सहभागी होतील. 

परदेशांतून 12 ते 23 मार्चपर्यंत भारतात आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील व्यक्तींची अधिक बारकाईने तपासणी करा. त्यांना क्वारंटाईन कसे करता येईल, ते पाहा. अद्याप न सापडलेल्या अशा व्यक्तींचा कोणत्याही परिस्थितीत शोध घ्या. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आपापल्या प्रभागांमधील खासगी डॉक्‍टरांशी संपर्क साधून दवाखाने सुरू करण्याची विनंती करा. त्यांना मास्क व अन्य आवश्‍यक वस्तू द्या. त्यांनी नियमितपणे रुग्णांची तपासणी सुरू केल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असेही ठाकरे म्हणाले. 

स्वच्छतेवर भर अत्यावश्‍यक 
वस्त्यांमधील स्वच्छतागृहांची नियमितपणे साफसफाई आणि जंतुनाशकांची फवारणी केली पाहिजे. त्या ठिकाणी हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करा. साथीचे आजार वस्त्यांमध्ये पसरण्यास फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष द्या 
कोरोनाबाधितांमध्ये 20 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती असल्या, तरी सर्वाधिक धोका वृद्धांना असतो. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रित करा, असे मार्गदर्शन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, साथरोगाला रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी परदेशांतून आलेले प्रवासी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेण्याची सूचना केली.

to fight against novel corona virus BMC has decided to chek all citizens of all wards of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com