किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांत तलवारी काडुन मारामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

विरार पश्चिम विवा कालेज समोरील देशी चाय कट्ट्यावर एकमेकाकडे पाहुन ठस्सन देण्याच्या कारणावरुन चक्क कालेज तरुणाच्या दोन गटात तलवारी काडुन तुंबळ मारामारी झाल्याची घटना रविवार ता. अठ्ठाविस रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.

नालासोपारा : विरार पश्चिम विवा कालेज समोरील देशी चाय कट्ट्यावर एकमेकाकडे पाहुन ठस्सन देण्याच्या कारणावरुन चक्क कालेज तरुणाच्या दोन गटात तलवारी काडुन तुंबळ मारामारी झाल्याची घटना रविवार ता. अठ्ठाविस रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.

विरार पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने कोनताही अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकरणात दोन्ही गटातील चार तरुणांना तात्काळ ताब्यात घेवुन त्यांच्यावर दंगल घडविने, सह शस्त्र अधिनियम कायदा कलम चार, पंचेविस, मुंबई पोलिस कायदा कलम 37(1)(3) आणी 135 प्रमाणे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केले आहे. 

रणजीत तानाजी दळवी (22), मोईन इरशाद खान (25), निसर्ग कनु पटेल (19), आणी अभिषक चंद्रशेखर पुजारी (20) असे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव आहेत. अटक झालेले तरुण हे सर्वच प्रतिष्टीत घरातील आहेत. तर यांचे दहा ते पंधरा साथीदार फ़रार आहेत. 26 जुलै रोजी या तरुणांमध्ये एकमेकांत ठस्सन करण्याच्या किरकोळ कारणावरुन विरार पश्चिम विवा कालेज समोरील देशी चाय कट्टा याठिकाणी वाद निर्माण झाला होता. या वादातुन त्यांचे भांडणही झाले. त्यानंतर दुस-या दिवसी पुन्हा वाद झाला. तीसऱ्या दिवशी मात्र या तरुणांनी चक्क विरार पुर्व मोरया नगर परिसरात येवुन तलवारी हातात घेवुन हाणामारीस सुरुवात केली होती.

ही घटना विरार पोलिसांना समजताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याजवळील एक तलवार, एक चाकु असे हत्यारही जप्त केले आहेत. शेवटी या प्रकरणात पोलिसांनीच तक्रार दार बनुन कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवुन दंगल घडविण्याच्या उद्देशाने हातात शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fights in college youth for minor reasons in Virar