फैजल मिर्झावर आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबई, गुजरात व उत्तर प्रदेशात घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्याचा आरोप असलेला जोगेश्‍वरीचा रहिवासी फैजल मिर्झा याच्यासह चौघांविरोधात दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ते एक हजार 155 पानांचे आहे.

या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे, तर दोन आरोपी फरारी आहेत. फैजलला त्याचा आतेभाऊ फारूक देवडीवाला याने शारजाला बोलावून घेतले होते. पाकिस्तानमार्गे दुबईहून नैरोबीला जाणाऱ्या विमानात बसलेला फैजल नैरोबीला न जाता पाकिस्तानात कराची विमानतळावर उतरला. फारूकने नेमून दिलेल्या हस्तकांच्या मदतीने तो कराची विमानतळातून बाहेर पडला. आयएसआयच्या दहशतवाद्यांनी त्याला थेट दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षण केंद्रावर नेले, असा "एटीएस'चा दावा आहे.

पाकिस्तानचे अडथळे
या प्रकरणात देवडीवाला या "आयएसआय'च्या एजंटलाही आरोपी केले आहे. त्याला शारजा स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पाकिस्तानानेही तो आपला नागरिक असल्याचे सांगून त्याच्या प्रत्यार्पणात अडथळा निर्माण केला आहे.

Web Title: File chargesheet on Faizal Mirza Terrorist Crime