'वसई विरार पालिकेतून २९ गावे वगळण्याच्या प्रस्तावित निर्णयावर अहवाल दाखल करा'

'वसई विरार पालिकेतून २९ गावे वगळण्याच्या प्रस्तावित निर्णयावर अहवाल दाखल करा'

मुंबईः वसई विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या प्रस्तावित निर्णयाबाबत अहवाल दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. महापालिका क्षेत्रातून 29 गावे वगळण्याचा तिढा मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे.

गावे वगळण्याच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. गुरुवारी न्या अमजद सय्यद आणि न्या एस पी तावडे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. या मुद्यावर स्थानिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. याबाबतची कार्यवाही सुमारे दोन आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर न्यायालयात अहवाल दाखल करु, असे राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी खंडपीठाला सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने तीन आठवड्यात अहवाल दाखल करण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब केली.

आगाशी, वटार कोपराड, राजोडी,नाळे ,वाघोली,नवाले,गिरीज,निर्मळ,भुईगाव,खु., भिगाव बु., गास , साळोली,कौलार खु., कौलार बु. , कसराळी , दहिसर, कोशिंबे, काशीद, कोपर, कणेर , शिरसाड ,मांडवी, चांदीप कोल्ही , देवदल,चिंचोटी, कामण , बापाणे आणि ससुनवघर या गावांचा यामध्ये समावेश आहे. याचिकादारांकडून एड नीता कर्णिक तर महापालिकेच्या वतीने एड स्वाती सागवेकर यांनी बाजू मांडली.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

File report proposed decision exclude 29 villages Vasai Virar Municipality bombay high court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com