माजी नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मानखुर्द  - ट्रॉम्बे चिता कॅम्पमधील माजी नगरसेविका खैरुनिसा अकबर हुसेन यांच्या पतीसह १३ जणांविरोधात एका महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तक्रारीनंतर हुसेन यांच्या पतीसह सर्व आरोपी फरारी आहेत. 

मानखुर्द  - ट्रॉम्बे चिता कॅम्पमधील माजी नगरसेविका खैरुनिसा अकबर हुसेन यांच्या पतीसह १३ जणांविरोधात एका महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तक्रारीनंतर हुसेन यांच्या पतीसह सर्व आरोपी फरारी आहेत. 

माजी नगरसेविकेचे पती अकबर हुसेन ऊर्फ राजू बटला यांच्याकडून तक्रारदार महिला कमरुनिसा ताजुदिन नस्तर हिने काही पैसे उसने घेतले होते. या वेळी त्यांनी महिलेकडून एका कागदावर स्वाक्षरी घेतली होती. पैसे परत देण्यावरून कमरुनिसा व अकबर हुसेन यांच्यात वाद झाल्यानंतर हुसेन. त्यांचा मावस भाऊ युसुफ शेख, साजिद शेख, त्यांचा मेहुणा माजीद मोहम्मद हनीफ व स्वीय सहायक मुन्ना या पाच जणांसह काही साथीदारांना घेऊन तिच्या घरी गेले. ‘हे घर माझे आहे, ते रिकामे करा’ असे त्यांनी सुनावले. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन शिवीगाळ व किरकोळ हाणामारी झाली. या घटनेनंतर  
कमरुनिसा यांनी पाच जणांसह अन्य आठ अनोळखी व्यक्तींविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे १३ जण फरारी आहेत. ट्रॉम्बे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Filed against the former husband .Corporator