esakal | मुंबई पोलिसांविरोधात ट्विट करणं कंगनाला महागात, तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिसांविरोधात ट्विट करणं कंगनाला महागात, तक्रार दाखल

मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकरानं ही तक्रार दाखल केली आहे. मुंबई पालिकेचे अधिकारी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचले आहेत. तिथे ते कार्यालयाबाबत तपासणी करत आहेत.

मुंबई पोलिसांविरोधात ट्विट करणं कंगनाला महागात, तक्रार दाखल

sakal_logo
By
राजू परुळेकर

मुंबईः  मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार विरोधात बदनामीकारक ट्विट  करणं अभिनेत्री कंगना राणावतला महागात पडलं आहे. कंगनाविरोधात गोरेगाव वनराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगना राणावतनं जाणीवपूर्वक बेछूट टीका करणारे ट्विट केले. यात तिनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकरानं ही तक्रार दाखल केली आहे.

कंगनाच्या ट्वीटनं महाराष्ट्र सरकारच्या अस्मितेला धक्का लागला आहे. संपूर्ण देशाला आदरणीय असलेल्या मुंबई पोलिसांना हिणवणं, एक भारतीय नागरिक आणि त्यानंतर एक सामान्य मुंबईकर या नात्यानं मला पटणारे नाही. मुंबईला पीओके असे संबोधत तिनं संबंध महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचं तक्रारदारानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.  ९ सप्टेंबरला मी मुंबईत येत असून, कोण मला रोखतं ते बघू असे खुले आव्हान तिने महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यामुळे आता राज्याचा आणि मुंबई पोलिसांच्या प्रतिष्टेचा हा मुद्दा बनला असल्याचंही त्यानं तक्रारीत लिहिलं आहे.

हेही वाचाः  पावसाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांसह तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

कंगना राणावतचं बोचक ट्विट आणि दिलेल्या आव्हान यामुळे मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यविरोधात आदित्य सरफरे यांनी शनिवरी मुंबई अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्यात तक्रारीची प्रत पाठविण्यात आली. आता कंगना विरोधात दोन दिवसात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

अधिक वाचाः  मुंबईत सप्टेंबर महिना ठरतोय रुग्णवाढीचा महिना, धोका वाढतोय

सोशल मीडियावर तिने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या कलमान्वये भारतीय दंड विधान IPC 499, IPC 500 आणि IPC 124 A हे कलम लावण्यात यावे. मुंबई पोलfसांची बदनामी म्हणजे कर्तव्यदक्ष नीतिमूल्यांची मानहानी आहे आशा स्वरूपाचा समावेश गुन्ह्यात आहे.

मनपा अधिकारी कंगनाच्या कार्यालयात

आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पालिकेचे अधिकारी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचले आहेत. तिथे ते कार्यालयाबाबत तपासणी करत आहेत. त्यानंतर ते तिच्या घरी देखील जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

(संपादनः पूजा विचारे)

Filed a case against Kangana Ranaut at Goregaon police station

loading image