"नालासोपारा'प्रकरणी दोषारोपपत्र दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - नालासोपाऱ्यातील स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी बुधवारी (ता. 5) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार 842 पानांचे दोषारोपपत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केले. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला असून, आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याचेही नमूद केले आहे. एटीएसने गेल्या महिन्यात एनआयएकडे दोषारोपपत्र सादर करण्याकरता एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे काही जण घातपात घडवणार असल्याची माहिती ऑगस्टमध्ये एटीएसला मिळाली होती. त्यावरून एटीएसने नालासोपारा येथून वैभव राऊत व शरद कळसकर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी राऊत व कळसकर यांच्या घराची घडती घेतली होती. कळसकरच्या घरातून बॉंब बनवण्याच्या कृतीच्या दोन चिठ्ठ्या आणि राऊतच्या घरातून 20 गावठी बॉंब, जिलेटिनच्या कांड्या, विषारी रसायनाच्या दोन बाटल्या आणि स्फोटकांची भुकटी आढळली होती. दहशतवादी कारवायांसाठी टोळी बनवून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या हेतूने स्फोटक पदार्थांचा साठा केल्याच्या आरोपाखाली या तिघांना अटक करण्यात आली. 

हिंदू धर्म, रुढी, परंपरा आदींवर टिप्पणी करणारे साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी आरोपींनी तयारी केली होती. ही टोळी हिंदू धर्म, रुढी आणि प्रथांच्या विरोधात विडंबनपर लिखाण करणाऱ्या व्यक्ती व कार्यक्रमांना लक्ष्य करणार होती, असे एटीएसचे म्हणणे आहे. 

हिंदू राष्ट्रनिर्मितीचा हेतू 
एटीएसने जप्त केलेल्या काही डायऱ्यांमधील सांकेतिक शब्दांची उकल आरोपींकडून करण्यात आली आहे. आरोपींनी त्यांचे मोबाईल कटाच्या काळात बंद ठेवले होते. वेगळ्या नावांवरील सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून वापर केला होता. हे आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे सदस्य आहेत. सनातन संस्थेच्या "क्षात्रधर्म साधना' या पुस्तकात नमूद केल्यानुसार हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या हेतूने समविचारी युवकांची टोळी निर्माण करण्यात आली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

Web Title: Filed a charge sheet case of Nalasopara