चित्रपट संघटनांच्या दादागिरीमुळे निर्माते दिग्दर्शक मेटाकुटीला!

निर्माते व दिग्दर्शकांची आता महाराष्ट्राबाहेरील चित्रीकरणास अधिक पसंती
box office
box officesakal media

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात (Entertainment Field) असलेल्या विविध चित्रपट संघटनांच्या दादागिरीमुळे (Film Association) निर्माते व दिग्दर्शक मेटाकुटीला आले आहेत. मुंबई तसेच आसपासच्या परिसरात चित्रीकरण करायचे म्हटले तर या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मनस्ताप तसेच पोलिस आणि महापालिका (Police And Municipal Corporation) व अन्य सरकारी खात्यांमधील अधिकाऱ्यांना द्यावी लागणारी चिरीमिरी यामुळे निर्माते व दिग्दर्शक कमालीचे वैतागले आहेत. चित्रपट संघटनांच्या माफियागिरीमुळे महाराष्ट्रात चित्रीकरण करणे (Shooting in Maharashtra) कठीण झाले आहे. सध्या उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात अधिक चित्रीकरण सुरू आहे. (Film Association bad behavior irritating Movie producer And directors)

कलादिग्दर्शक राजू साप्ते यांनी काल आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी रेकाॅर्ड केलेल्या एका व्हिडीओमध्ये लेबर युनियनच्या एका पदाधिकाऱ्याचे नाव घेतले आहे. त्यामुळेचित्रपटसृष्टीतील विविध चित्रपट संघटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चित्रपटसृष्टीत विविध राजकीय पक्षांच्या संघटना आहेत आणि त्या संघटनांचे काही प्रतिनिधी निर्माते व दिग्दर्शक यांना प्रत्यक्ष चित्रीकरण स्थळी जाऊन कसा मनस्ताप देत आहेत. चित्रीकरण स्थळी जाऊन ते बंद करण्याच्या धमक्या कशा देत आहेत. आदी प्रकार समोर येत आहेत. या चित्रपट संघटना चित्रपटसृष्टीच्या कल्याणासाठी किंवा चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी आहेत की निर्माते व दिग्दर्शक यांना धमकावण्यासाठी आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

box office
ऑक्टोबरपासून लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला प्रारंभ ? कोविड टास्क फोर्सची माहिती

संघटनांच्या अशा अरेरावी वागण्यामुळे निर्माते व दिग्दर्शक आता मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांना अधिक पसंती देऊ लागलेले आहेत. सध्याच्या घडीला सगळ्यात अधिक मालिका तसेच चित्रपटांचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी सुरू आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेश,  गुजरात, गोवा आदी ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. राज्य सरकारने अशा संघटनांवर काही तरी अंकुश ठेवण्याची पाळी आली आहे असा सूरही चित्रपटसृष्टीत उमटत आहे. याबाबत दिग्दर्शक राजू पार्सेकर म्हणाला, की चित्रपट संघटनांची गुंडगिरी वाढलेली आहे. त्यांची माणसे सकाळी सकाळी चित्रीकरण स्थळी येतात आणि अरेरावीला सुरुवात करतात.

त्यांना कार्ड तपासण्याचा अधिकार कुणी दिला? भारतीय घटनेच्या कलम ४१ नुसार कोणालाही काम करण्याचा अधिकार आहे. मग ही मंडळी कार्ड कसले तपासतात. शिवाय चित्रपटसृष्टीला अजूनही इंडस्ट्रीचा दर्जा मिळालेला नाही. या चित्रपट संघटनांच्या माफियागिरीमुळे आता महाराष्ट्रात चित्रीकरण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण वाढले जाणार आहे. सध्याच्या घडीला मध्य प्रदेशमध्ये वेबसीरीज आणि चित्रपट असे मिळून सत्तावीस ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे.

box office
मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, की आता यापुढे कोणताही राजकीय पक्ष किंवा चित्रपट संघटना सेटवर जाणार नाही. जो कुणी सेटवर जाईल किंवा निर्माते व दिग्दर्शक यांना धमकी देईल त्याचा बंदोबस्त मनसे स्टाईलने केला जाईल.प्राॅडक्शन मॅनेजर प्रमोद मोहितेने सांगितले, की राजू साप्तेची घटना खूप दुर्दैवी आहे. ही घटना युनियनमुळेच घडली आहे. त्यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये याकरिता सगळ्या युनियनने एकत्र येऊन विचार करावा आणि चांगला मार्ग काढावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com