अमली पदार्थ तस्करीप्रकरणी चित्रपट निर्मात्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - अमली पदार्थ तस्करीप्रकरणी यादविंदर ऊर्फ एस. बसराव या चित्रपट निर्मात्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता.10) दिल्लीतून अटक केली.

मुंबई - अमली पदार्थ तस्करीप्रकरणी यादविंदर ऊर्फ एस. बसराव या चित्रपट निर्मात्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता.10) दिल्लीतून अटक केली.

यादविंदर हा पंजाबचा रहिवासी आहे. त्याने एका चित्रपटाची निर्मिती केली होती. आणखी दोन चित्रपटांच्या निर्मितीसाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे तो अमली पदार्थांची तस्करी करीत होता. यादविंदर एका मोठ्या तस्कराकडून 10-15 किलो अमली पदार्थ विकत घेऊन मुंबईतील दलालांना विकत असे. त्या बदल्यात कमिशन म्हणून त्याला मोठी रक्कम मिळत होती. महागड्या गाडीत बसून रात्री तो हा धंदा करीत असे. यादविंदर दिल्लीत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटचे पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला लॉजमध्ये अटक केली.

Web Title: film director arrested in drugs smuggling