
विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यामुद्द्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. फिल्म इंडस्ट्रीसाठी मुंबईसारख्या सुविधा कोणतंही राज्य देऊ शकणार नसल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणारेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यावरुन राजकारण तापलं आहे. यावरुन आता विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यामुद्द्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. फिल्म इंडस्ट्रीसाठी मुंबईसारख्या सुविधा कोणतंही राज्य देऊ शकणार नसल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईमध्ये जी फ्लिम इंडस्ट्री आहे, बॉलिवूड आहे. जे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतून त्याच काम चालत. यानिमित्तानं सिनेमांमध्ये ज्याप्रकारच्या सुविधा आणि आणखीन चांगल्या गोष्टी मिळत आहे. या सर्व सुविधा मुंबईमध्ये असल्यामुळे कोणतंही राज्य अशा प्रकारच्या सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे फिल्म इंडस्ट्री बाहेरच्या राज्यात जाईल किंवा आपल्या राज्यात होण्यासाठी प्रयत्न करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. फिल्म इंडस्ट्री मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही हे माझं ठाम मत आहे.
फिल्म इंडस्ट्री मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नसल्याचं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. #anildeshmukh #YogiJiInMumbai #YogiInMumbai pic.twitter.com/v8U9DrhY5D
— sakalmedia (@SakalMediaNews) December 2, 2020
बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करण्यासोबत योगी आदित्यनाथ महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी देखील चर्चा करणार आहेत.काल रात्री अभिनेता अक्षय कुमारची त्यांनी भेट घेतली. तसंच उद्योग जगातातील टॉप १०० उद्योजकांशी मुख्यमंत्री चर्चा करतील.
Film industry cannot go outside Mumbai Home Minister Anil Deshmukh