चित्रपट निर्माते चंपक जैन यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि व्हीनस कंपनीचे मालक चंपक जैन यांचे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने गुरुवारी (ता. 31) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि व्हीनस कंपनीचे मालक चंपक जैन यांचे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने गुरुवारी (ता. 31) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. जैन यांच्या आकस्मिक निधनाबद्दल चित्रपट क्षेत्रात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. 

चंपक जैन यांनी पुढील चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुरुवारी सायंकाळी जुहू येथील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीच्या वेळीच त्यांच्या मेंदूत रक्तस्राव सुरू झाला. त्यांना तातडीने जुहू येथील सिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 1) सकाळी 11 वाजता जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. जैन यांनी "जोश', "मै खिलाडी, तू अनाडी' आणि अन्य चित्रपटांची निर्मिती केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filmmaker Champak Jain dies