इंग्रजीत पत्रव्यवहाराबद्दल एसटीकडून 100 रुपये दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - एसटी महामंडळाचे कामकाज राजभाषा मराठीत करण्याचा आदेश असताना, इंग्रजीत पत्रव्यवहार केल्याबद्दल भंडारा जिल्ह्यातील विभाग नियंत्रकाला 100 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरून मध्यवर्ती कार्यालयाला कळवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने सरकारी कामकाज मराठीत करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता; परंतु भंडारा येथील एसटी विभाग नियंत्रकांनी विवरणपत्र आणि कर्मचारी स्थितीबाबत इंग्रजीत माहिती पाठवली, त्यामुळे एसटी महामंडळाच्या मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांनी त्यांना 100 रुपयांचा दंड केला आहे.

Web Title: Fine by St for English Letter