मोखाड्यात तणावपूर्ण शांतता 85 दंगलखोरांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

मुस्लिम समाजातील दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी येथे तणावपूर्ण शांतता होती. मोखाडा पोलिसांनी दोन्ही गटांवर दंगल घडविल्याचा आरोप ठेवून 85 दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले.

मोखाडा : मुस्लिम समाजातील दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी येथे तणावपूर्ण शांतता होती. मोखाडा पोलिसांनी दोन्ही गटांवर दंगल घडविल्याचा आरोप ठेवून 85 दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले. त्यातील 42 जणांना ताब्यात घेण्यात आले. जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना 12 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

शुक्रवारी झालेल्या दंगलीत दोन्ही गटांतील सात ते आठ जण जखमी झाले होते. पवित्र रमजान महिन्यात दंगलीची घटना घडल्याने मुस्लिम मोहल्ल्यात तणावाचे वातावरण आहे. समाजातील इतर घटकांना स्वच्छंदी वातावरणात नमाज अदा करता यावी, म्हणून मुस्लिम मोहल्ल्यात शीघ्र कृती दल आणि दंगलविरोधी पथकाच्या दोन तुकड्यांसह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोखाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सोनवणे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: FIR registered against 85 peoples