कुर्ला येथे मेहताब इमारतीला भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

कुर्ला पश्‍चिम येथील एस. जी. बर्वे मार्गालगत असलेल्या मेहताब इमारतीला आज संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली

मुंबई : कुर्ला पश्‍चिम येथील एस. जी. बर्वे मार्गालगत असलेल्या मेहताब इमारतीला आज संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र सिलेंडरच्या स्फोटामुळे आग अधिकच भडकत असल्याचे दिसत होते. आगीच्या ज्वाळांनी आग जवळच्या निवासी
भागात पसरू नये याची काळजी अग्निशमन दलाचे जवान घेत होते. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आग लागताच तातडीने चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हा विभाग दाट लोकवस्तीचा असल्याने तेथे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोचणे अडचणीचे झाले होते. आग लगतच्या वस्तीत पसरू नये यासाठी दलाचे प्रयत्न सुरू होते. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप दलाला मिळू शकली नाही. या आगीत अद्याप जिवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire breaks out in kurla west fire engines rushed to the site