फोर्ट येथील बाहूबली इमारतीत आगीचा भडका; एकाची प्रकृती गंभीर

समीर सुर्वे | Wednesday, 26 August 2020

फोर्ट येथील बाहूबली इमारतीत आज संध्याकाळी आगीचा भडका उडाला.या आगीत एक 22 वर्षीय तरुण होरपळला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

मुंबई : फोर्ट येथील बाहूबली इमारतीत आज संध्याकाळी आगीचा भडका उडाला.या आगीत एक 22 वर्षीय तरुण होरपळला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा 

फोर्ट येथील कावासजी पटेल मार्गगावर ही इमारत आहे.संध्याकाळी साडे सात वाजल्याच्या सुमारास या इमारतीत आगीचा भडका उडाला.दिपक दिलदार हा 22 वर्षाचा तरुण या आगीत होरपळला आहे.हा तरुण 30 ते 35 टक्के भाजला असून त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अभिनेत्री कंगना रानौतने केली बॉलिवूडमधील सर्व कलाकारांची नारकोटिक्स टेस्ट करण्याची मागणी

अग्निशमन दलाचे 5 बंब घटना स्थळी दाखल झाले आहेत.आग अद्याप पुर्ण अटोक्यात आलेली नाही.