चेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्केटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक

जीवन तांबे
Thursday, 1 October 2020

चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. चेंबूर रेल्वे स्थानकाला लागून जनता मार्केट आहे. हे जनता मार्केट कॉलेकटरच्या जागेत आहेत.

या मार्केटमधील रेल्वे लाईन जवळील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे  5 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. याच रेल्वे स्थानक जवळील काही विक्रेते यांनी ही आग लागलेली पहातच या आगीची माहिती चेंबूर पोलिस ठाणे आणि अग्निशामक दलाला दिली. आगीची माहिती मिळाताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या दहा गाड्या 5.26 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

आधी झेरॉक्स च्या दुकानाला लागलेली आग पसरत बाजूच्या 4 दुकानापर्यंत पोहचली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत 4 ते 5 दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दुकान क्रमांक 45, 46, 47, 48 तसेच इतर पाच दुकाने या आगीत भस्म झाली आहे.

जनता मार्केटमध्ये जवळपास 100 च्या आसपास झेरॉक्स, स्टेशनरीची दुकान आहेत.या दुकानांमधील झेरॉक्स मशीन, संगणक विविध साहित्य जळून खाक झाली आहेत. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत असल्यानं नागरिकांमध्ये देखील खळबळ उडाली होती. मात्र आगीचं कारण समजू शकलं नाही.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Fire broke out janata market near Chembur railway station Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire broke out janata market near Chembur railway station Mumbai