कल्याण पूर्व मधील एका विद्युत खांबावरील बॉक्सला आग 

रविंद्र खरात 
शनिवार, 2 जून 2018

कल्याण पूर्व मधील गणेशनगर आणि मंगलराघोनगर परिसरात शुक्रवार ता. 1 जून रोजी रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास एका विद्युत पोल वरील बॉक्सला आग लागल्याने त्या परिसरात काही भागात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता तो तब्बल 14 तासाने पूर्वरत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

कल्याण - कल्याण पूर्व मधील गणेशनगर आणि मंगलराघोनगर परिसरात शुक्रवार ता. 1 जून रोजी रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास एका विद्युत पोल वरील बॉक्सला आग लागल्याने त्या परिसरात काही भागात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता तो तब्बल 14 तासाने पूर्वरत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक त्रस्त असताना शुक्रवार ता. 1 जूनच्या रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास कल्याण पूर्व मधील मंगलराघोनगर, गणेशनगरमधील विद्युत खांब्यावरील एका बॉक्सला आग लागली त्यात आजूबाजूच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर जळून खाक झाल्या. रात्री मोठ्या प्रमाणातील आग ही दुरवरून दिसत होती तर त्या वेळी मोठमोठे फटाके फुटतात तसा आवाजही वेळी एैकू येत होता. यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण होते.एकीकडे उन्हाचा पारा आणि दुसरीकडे आगीमुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आगीची माहिती मिळताच महावितरण विभागाने आज (ता.2) जून सकाळ पासून काम सुरू केले. 

विद्युत पुरवठा करणाऱ्या खांब्यावर विजपुरवठयाचा अतिरिक्त भार वाढल्याने केबल गरम होऊन केबलसह अन्य सर्विस वायरने पेट घेतला, अशी माहिती स्थानिक रहिवाशी सचिन पवार यांनी दिली. 

त्याचबरोबर, कल्याण पूर्व मधील शुक्रवारी रात्री सव्वाबारा वाजता पोलवर आग लागल्याने काही भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता दुरुस्तीचे काम पूर्ण होताच आज दुपारी दुपारी सव्वादोन वाजता विद्युत पुरवठा पूर्वरत करण्यात आला, अशी माहिती महावितरण कल्याण परिमंडळ उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.

Web Title: fire on electric pole in Kalyan East