वाहनतळातील अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावर

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

खारघरमधील प्रकार; दुरुस्‍तीसाठी चालकांची सिडकोकडे मागणी 

खारघर : खारघर रेल्वेस्थानकाच्या वाहनतळावरील अग्निशमन यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद आहे. परिणामी, अचानक एखाद्या वाहनात बिघाड होऊन आगीची दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंद असलेली अग्निशमन यंत्रणा सिडकोने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. 

सीएसटी ते पनवेल महामार्गवरील खारघर रेल्वेस्थानकावर सिडकोने वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ उभारला आहे. छतावर वाहनतळ उभारताना सिडकोने आगीची घटना घडल्यास प्रतिबंधित उपाय म्हणून छतावर अग्निशमन यंत्रणा बसविली; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अग्निशमन यंत्रणा बंद आहे. त्यामुळे सिडकोने बंद असलेली अग्निशमन यंत्रणा दुरुस्त करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. याविषयी सिडकोचे मुख्य परिवहन आणि नियोजनकार सोमा विजयकुमार यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

खारघर रेल्वेस्थानकावरील अग्निशमन यंत्रणेची माहिती घेतली जाईल. 
- अरविंद मांडके, अग्निशमन अधिकारी, सिडको


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fire extinguished not working