चेंबुर : सह्याद्री नगर परिसर व आरसीएफ डोंगराजवळ आगडोंब

Fire at chembur
Fire at chembursakal media

चेंबूर : चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील सह्याद्री नगर भागात (Sahyadri Nagar Area) व आरसीएफ डोंगराला (RCF Mountain) मंगळवार सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गवताला भीषण आग (Fire incident) लागली. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी (No casualties) झालेली नाही. वाशीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपनी आहेत. तसेच पांजरापोल आणि आणिक बोगदा आहे. या बोगद्याच्या बाजूला सह्याद्री नगर आहे. या नगरात एकूण (slum area) 15000 पेक्षा अधिक झोपड्या आहेत.

Fire at chembur
विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी का भडकावले? हायकोर्टाने हिंदुस्थानी भाऊला फटकारले

आज या सह्याद्री नगरच्या खाल च्या बाजूला व आरसीएफ डोंगराजवळ डोंगराखाली मोठ्या प्रमाणत कचरा साचला होता. उष्णतेमुळे अचानक या कचऱ्याला आग लागली. ही आग एवढी मोठ्या प्रमाणात पसरत होती. त्यामुळे डोंगरावरील झाडे-झुडपाचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी या आगी बाबत स्थानिक आरसीएफ पोलीस व अग्निशामक दलाल माहिती दिली असता अग्निशामक दलाच्या चेंबूर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या व देवनार अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या व रात्री 9. 30 वाजेपर्यंत पर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे आरसीएफ पोलिसांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com