कल्याणमध्ये गोदामाला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

ठाणे - कल्याण-शीळ फाटा येथील लाकडाच्या गोदामाला रविवारी सकाळी 10च्या सुमारास आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळावर पोहचल्याने मोठी दुर्घटना टळली.

कल्याण-शीळ फाटा रोडवरील डायघर चौक येथील इक्‍बाल चाळ येथे असलेल्या लाकडाच्या गोदामाला रविवारी सकाळी 10च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या अवघ्या 10 मिनिटांतच घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत दोन गोदामांतील सामान खाक झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: fire in kalyan

टॅग्स