मिरा रोड स्थानकात आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

भाईंदर- पश्‍चिम रेल्वेवरील अंधेरी येथे मंगळवारी (ता. ३) सकाळी पुलाचा भाग कोसळल्यानंतर मिरा रोड येथील तिकीट आरक्षण केंद्राला आग लागली. त्यामुळे लोकल वाहतूक खोळंबल्याने हजारो चाकरमान्यांना फटका बसला. मिरा रोड स्थानकातील बांधकाम सुरू असलेल्या आरक्षण केंद्राला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आरक्षण केंद्रात ठेवलेल्या पीव्हीसी पाईपमुळे आग पसरली; मात्र कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजले नाही.

Web Title: Fire at Mira Road Station