अग्निशमन यंत्रणेबाबत सोसायट्या उदासीन 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई -  मुंबईत आगी लागण्याचा घटना वाढत आहेत. असे असताना मुंबईतील अनेक सोसायट्या आणि व्यावसायिक इमारती अग्निशमन यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करत आहेत. नादुरुस्त अग्निशमन यंत्रणा दुरुस्ती किंवा बदलण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. अग्निसुरक्षा यंत्रणेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबईत घडलेल्या आगीच्या दुर्घटनांनंतर काही महिन्यांपूर्वी अग्निशमन यंत्रणेने केलेल्या तपासणीत चार हजार 647 इमारतींतील अग्निशमन यंत्रणा कूचकामी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या इमारतींतील अग्निशमन यंत्रणा दुरुस्ती करण्याच्या सूचना अग्निशमन दलाने दिल्या आहेत. त्यानंतर काही व्यावसायिक आणि सोसायट्यांनी यंत्रणा दुरुस्ती केली; तर बहुतांश इमारतींनी याकडे दुर्लक्ष केले. दुर्लक्ष करणाऱ्या इमारतींना नोटिसा पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काहींवर कारवाई करूनही अद्याप अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. 

देखरेखीसाठी यंत्रणा 
इमारतीतील अग्निशमन यंत्रणेचे दर सहा महिन्यांनी ऑडिट करणे आवश्‍यक आहे. त्याची माहिती संबंधित विभागाला कळवणे नियमानुसार बंधनकारक आहे. अनेक सोसायट्या याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. लवकरच अग्निशमन यंत्रणा आहे की नाही; तसेच यंत्रणेचे नियमानुसार ऑडिट जाते का, यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुरू केली जाणार आहे, असे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Fire safety society mumbai