इमारतींतील अग्निसुरक्षेच्या तपासणीसाठी 70 अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दल 70 अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

त्याचबरोबर शहरातील सर्व इमारतींचा लेखाजोखा बिल्डिंग मॅपिंग या सॉफ्टवेअरमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या इमारतींवर वेळीच कारवाई करणे शक्‍य होणार आहे.

कुलाबा येथील मेकर चेंबर या इमारतीत मंगळवारी लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मदत झाली; मात्र अनेक इमारतींमध्ये ही यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.

मुंबई अग्निशमन दलामार्फत वेळोवेळी इमारतींची तपासणी होते; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कामावर मर्यादा येते. त्यामुळे आता इमारतींच्या तपासणीसाठी 70 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी वेळोवेळी इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल "बिल्डिंग मॅपिंग' या सॉफ्टवेअरमध्ये टाकतील. त्यामुळे इमारतींवर कारवाई करणे सोपे होईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना मोबाईल
"बिल्डिंग मॅपिंग' सॉफ्टवेअर मोबाईल बेस असल्याने इमारतींच्या तपासणीसाठी नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाईल देण्यात येणार आहे. इमारतीच्या पाहणीसाठी जाणारे अधिकारी अहवालासोबत तेथील परिस्थितीचे छायाचित्रही या सॉफ्टवेअरवर अपलोड करतील. ही छायाचित्रे पुरावे म्हणून वापरता येतील, असे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: fire security cheaking officer for building

टॅग्स