वृंदावन स्टुडिओतील हिंदी मालिकेच्या सेटला आग

अच्युत पाटील
शुक्रवार, 18 मे 2018

बोर्डी (पालघर) : गुजरात राज्यातील उंबरगाव (देहरी) येथील वृंदावन स्टुडिओला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बोर्डी (पालघर) : गुजरात राज्यातील उंबरगाव (देहरी) येथील वृंदावन स्टुडिओला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना गुरूवारी (ती.17) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोरस या हिंदी मालिकेसाठी वृंदावन स्टुडियोमध्ये सेट उभारण्याचे काम सुरू होते. दरम्यान अचानक आग भडकल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे वीस कारागिर येथे सेट उभारण्याचे काम करीत होते.

आग लागल्याचे कळताच उंबरगाव औद्योगिक वसाहत आणि उंबरगव नगरपालिकेचे घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. तत्पूर्वीच कारागिर बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

रामायण, महाभारत सारख्या धार्मिक मालिकांच्या निर्मितीनंरत प्रसिद्ध झालेल्या वृंदावन स्टुडिओमध्ये विविध मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. सोनी टीव्ही वर सुरू असलेल्या "पोरस"मालिकेचे चित्रीकरण काल (ता. 17) अकरा वाजता सुरू करण्यात येणार होते. तत्पूर्वी कारागिर सेटवर अखेरचा हात फिरवत असतानाच शॉर्टसर्कीट झाल्याने आग भडकली असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Web Title: fire at set in vrindavan studio for hindi serial