शताब्दी रुग्णालयातील रक्तपेढीला आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मानखुर्द - गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील रक्तपेढी शुक्रवारी (ता. २४) पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीत रक्तपेढीतील साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शताब्दी रुग्णालयात पल्लवी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची रक्तपेढी आहे. रक्तपेढीमध्ये शॉर्टसर्किटने पहाटे साडेचार वाजता आग लागली. रक्तपेढीमध्ये तीन कर्मचारी होते. त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवली. कर्मचाऱ्यांनी रक्तसाठा व इतर उपकरणे दुसरीकडे हलवली. जवानांनी काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Fire in shatabdi hospital Blood Bank

टॅग्स