सिंधीया हाऊस इमारतीमध्ये भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई -  बॅलार्ड पिअर येथे आयकर भवनजवळील भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सिंधीया हाऊस इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाच्या ठिकाणी शुक्रवारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या 13 जणांची शर्थीचे प्रयत्न करून उंच शिडीच्या साह्याने सुटका केली; मात्र गणेश सोळंकी (48), नीलेश कुळकर्णी, विनोद दुबे (40), अनिल कदम (35), रमेश दुप्री (50); तसेच अग्निशमन दलाचे जवान जगदीश बाचल यांना धुरामुळे श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बॅलार्ड पिअर येथे तळमजला अधिक सहा मजली आयकर भवनजवळील भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सिंधीया हाऊस इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी परिसरातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. अग्निशमन दलाचे सहा जम्बो वॉटर टॅंकर, आठ फायर इंजिनच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. 

13 जणांना सुखरूप काढले बाहेर 
इमारतीला लागलेल्या आगीमुळे 13 जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी उंच शिडीचा वापर करून 13 जणांना सुखरूप बाहेर काढले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे. 

संशयाचा धूर 
ज्या ठिकाणी आग लागली, तेथे प्राप्तिकर विभाग, अन्वेषणचे कार्यालय असून पीएनबी, पीटर मुखर्जीसारख्या प्रकरणांची महत्त्वाची कागदपत्रे ठेवली आहे. त्यामुळे आगीमागे संशयाचा धूर उठत असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: fire in Sindhia House building

टॅग्स