सरकारी डॉक्‍टरांना अग्निशमनचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - सरकारी रुग्णालयांतील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 14 ते 20 एप्रिलदरम्यान होणाऱ्या अग्निशामक दल सप्ताहाचे औचित्य साधत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील रुग्णालयात आग लागली होती. त्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्‍टरांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयापासून या प्रशिक्षणास सुरवात होईल. पहिल्या टप्प्यात 1500 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Fire training to government doctors