उल्हासनगर महानगरपालिकेतील विद्युत डीपीला आग

दिनेश गोगी
मंगळवार, 27 मार्च 2018

उल्हासनगर : आज दुपारी महासभा सुरू असतानाच जिन्याखाली असलेल्या विद्यूत डीपीला आग लागली. आगडोंब सह फटाका बॉम्ब सारखे आवाज होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांत एकच घबराहट पसरली. अधिकारी, लोकप्रतिनिधी महासभेतून बाहेर पडले. अग्निशमन यंत्राने सुरक्षा रक्षकांनी आग आटोक्यात आणली तर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या पाऊण तासात डीपीचा पुरवठा बंद करून जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा सुरू केल्याने महासभेस पुन्हा सुरवात झाली.

बाहेर उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. त्यात आज महासभा असल्याने लोकप्रतिनिधी यांनीही पालिका गाठली होती. त्यातच जिन्याखाली असलेल्या विद्युत डीपीने अचानक पेट घेतला. फटका बॉम्ब सारखे आवाज येऊ लागले. पालिकेत अंधार पसरून सर्वत्र धूर दिसू लागला. सुरक्षा रक्षकांनी कर्मचारी नागरिक यांना पालिकेच्या बाहेर जाण्यास सांगितले. आयुक्त गणेश पाटील, महापौर मिना आयलानी यांच्यासह सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी महासभा सोडून खाली धाव घेतली. मुख्य सुरक्षा रक्षका अधिकारी बाळू नेटके, नागपुरे, जाधव, भोईर, पंजू यादव यांच्यासह सर्व सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन यंत्रसामग्री सह आग आटोक्यात आणली. आयुक्त गणेश विद्युत विभागाचे उप अभियंता हनुमंत खरात, कनिष्ठ अभियंता महेंद्र धिंडे, धनराज चव्हाण यांनी यंत्रणा बंद करून जनरेटर सुरु केल्यावर विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

Web Title: fire at ulhasnagar municipal corporation dp