कल्याण रेल्वे स्थानकाजवळील कचऱ्याला आग

रविंद्र खरात 
सोमवार, 23 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकामधील फलाट आणि रुळाच्या आजू बाजूचा प्रतिदिन उचलला जाणारा कचरा कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजूला एका खड्ड्यात टाकला जातो, आज सोमवारी (ता. 23) दुपारी अडीचच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ माजली, आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र आगीच्या धुरामुळे रेल्वे स्थानकातील काही प्रवाश्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

कल्याण रेल्वे स्थानकात एकूण 7 फलाट असून फलाट, रेल्वे रूळ, तिकीट घर, रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावरील प्रति दिन रेल्वे प्रशासन सफाई कर्मचारी मार्फत सफाई करते. दिवसभर जमा होणारा कचरा नेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिका सहकार्य करत नसल्याने रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकच्या एकच्या बाजूला एक खड्डा खोदुन तेथे प्रति दिन कचरा टाकत होते. आज (ता. 23) दुपारी अडीचच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ माजली. आगीचा धूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर आल्याने प्रवाश्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षाबलाच्या जवानांनी काही कर्मचारीच्या मार्फत ती आग विझवली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कचरा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला असून सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.

पालिका सहकार्य करत नसल्याने रेल्वेच्या जागेत आम्ही कचरा टाकुन त्याची विल्हेवाट लावत होतो, पर्याय नाही, आज आग लागली मात्र कुठलीही दुर्घटना घडली नसून पालिकेने सहकार्य केल्यास कचरा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती कल्याण रेल्वे स्थानक स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली.

शहरातील आम्ही कचरा उचलतो तसा रेल्वे परिसरातील ही कचरा आम्ही उचलू नेमकी काय समस्या आहे ती तपासून पाहून समस्या मार्गी लावू अशी माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. 

Web Title: fire at waste in kalyan railway station