फटाक्‍यांच्या किमतीत १० टक्‍क्‍यांनी वाढ

फटाक्‍यांच्या किमतीत १० टक्‍क्‍यांनी वाढ
फटाक्‍यांच्या किमतीत १० टक्‍क्‍यांनी वाढ

नवी मुंबई : सध्या मंदीची लाट असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र दिवाळ सणावर त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठ तेजीत असून, ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग सुरू आहे. कंदील व इतर सजावटीच्या सामनासह फटाक्‍यांची विक्री जोरात सुरू आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच यंदा फटाक्‍यांच्या किमतीत १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

कोजागरी पौर्णिमा झाली की विक्रेते फटाके आणण्यास सुरुवात करतात. शिवकाशी, वैजापूर, राहुरी, संगमनेर अशा विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर फटाक्‍यांचा माल आणला जातो. सध्या फुलबाजापासून, मटका पाऊस, बुलेट बॉम्ब, मिनी पॉट, ज्वेल पॉट, जमपिंग फ्रॉग, सिंगल ते हजार शॉटपर्यंतचे फटाके बाजारात पाहण्यास मिळत आहेत. घाऊक बाजारात लहान पाऊस ७० रुपये, मध्यम पाऊस १५० रुपये, मोठा पाऊस ३०० रुपये, लहान चक्र ७० रुपये, मध्यम चक्र ९० रुपये, तर मोठे चक्र १५० रुपयांना उपलब्ध आहे. छोट्या लवंगीचे १ पॅकेट १०० रुपये, तर लहानशी बॉम्ब १० पीसचे एक पॅकेट ५० रुपयांना उपलब्ध आहे. मोठे रशी बॉम्बसारख्या आवाजी फटाक्‍यांवर बंदी असल्याने असे फटाके ठेवत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

किरकोळ बाजारातील दर (रुपयांत)
- मोठा पाऊस     ४०० रुपये
- मोठी डिलक्‍स चक्री     ३०० रुपये
- रशी बॉम्ब १२० रुपयांपासून अधिक
- लवंगी माळ     २००० रुपयांपासून अधिक
- फुलबाजा     १०० रुपये पॅकेट
- बंदुकीचा रोल     १२० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com