उल्हासनगरात महाराष्ट्रातील पहिल्या वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन

दिनेश गोगी
गुरुवार, 24 मे 2018

आणि
उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या शुक्रवारी (ता. 25) या अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. स्पर्धापरीक्षेची पुस्तके या अभ्यासिकेत मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थी सुखावून गेले आहेत.

आणि
उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या शुक्रवारी (ता. 25) या अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. स्पर्धापरीक्षेची पुस्तके या अभ्यासिकेत मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थी सुखावून गेले आहेत.

शिवसेनेच्या राजश्री चौधरी ह्या स्थायी समिती सभापती असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बंडू देशमुख,मनोज शेलार यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील,मनवीसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर अभ्यासिकेचा पाठपुरावा केला होता.तेंव्हा पक्षभेद विसरून राजश्री चौधरी यांनी अर्थसंकल्पात अभ्यासिकेसाठी निधीची तरतूद करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला होता.

शिवसेनेच्याच अपेक्षा पाटील ह्या महापौर,मनोहर हिरे आयुक्त व जमीर लेंगरेकर हे शिक्षण उपायुक्त असताना 14 एप्रिल 2016 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने अभ्यासिकेचे भूमिपूजन करण्यात आले.विशेष म्हणजे शिवसेनेने पक्षभेदाला बाजूला सारून अभ्यासिकेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राजू पाटील,कौस्तुभ देसाई,बंडू देशमुख,मनोज शेलार या मनसेच्या चार नावांनाही कोनशीलवर स्थान दिले.तेंव्हा दिलदार मित्राची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता.

पालिकेच्या शाळा क्रमांक 8,11,29 च्या प्रांगणात अभ्यासिकेचे भूमिपूजन झाल्यावर आयुक्त मनोहर हिरे,उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या देखरेखीखाली खाली प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते,शिक्षण मंडळाच्या लेखापाल निलम कदम-बोडारे,स्वतंत्र अभियंता भूषण पाटील यांनी कंत्राटदार सुनिल पिंपळे यांच्याकडून अवघ्या दोन वर्षात लक्षवेधुन घेणाऱ्या अशा तीन मजली अभ्यासिकेचे काम पूर्ण करून घेतले.या अभ्यासिकेच्या तळमजल्यावर ग्रंथालय,पहिल्या मजल्यावर संगणक प्रशिक्षण केंद्र,दुसऱ्या मजल्यावर संकणक प्रोजेक्टर रूम व तिसऱ्या मजल्यावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असणार आहे.

या अभ्यासिकेचे उद्घाटन महापौर मिना आयलानी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी ठाणेजिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, राजन विचारे, आमदार ज्योती कलानी, डॉ.बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, आयुक्त गणेश पाटील, उपमहापौर जीवन इदनानी,स्थायी समिती सभापती जया माखिजा,सभागृहनेते जमनादास पुरस्वानी,विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे,मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first ac study center in ulhasnagar