कोरोनाचा सर्वाधिक कहर सहन करणाऱ्या मुंबईत कोरोनाची लस दाखल, आता प्रतीक्षा १६ तारखेची

सुमित बागुल
Wednesday, 13 January 2021

आज सकाळी साडे पाच वाजता मुंबईत कोरोनाच्या लसींचा पहिला साठा आला आहे

मुंबई  : अवघ्या २४ तासात देशातील तब्बल १३ शहरांमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून संशोधित आणि सिरम इन्स्टिट्यूट कडून तयार केल्या गेलेल्या कोव्हीशील्ड लस वितरित केली गेलीये. या चोवीस तासात एकूण ५६ लाख ५० हजार डोज देशभरात सीरामने वितरित केलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्वाधिक कोरोनाचा कहर पाहणाऱ्या मुंबईत देखील कोरोनाच्या लसी दाखल झालेल्या आहेत.

आज सकाळी मुंबईमध्ये कोरोनाच्या लसी पोहोचवण्यात आल्या आहेत. काल पासूनच सिरमच्या लसीच्या वितरणाला सुरवात झाली. त्यानंतर आजही २० शहरांमध्ये कोव्हीशील्ड लस पोहोचणार आहे. १६ जानेवारीला देशभरात लसीकरणाला सुरवात होणार असल्याने आता सर्व जण १६ तारखेची आतुरतेने वाट पाहतायत.

महत्त्वाची बातमी माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार  मूर्तिकार आणि कारागिरांना केंद्राचा दिलासा 

आज सकाळी साडे पाच वाजता मुंबईत कोरोनाच्या लसींचा पहिला साठा आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष गाडीतून महापालिका आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा मुंबईमध्ये आणला आहे. हा साठा मुंबई महापालिकेच्या परळमधील एफ दक्षिण विभागातून मुंबईतील विविध लसीकरण केंद्रांवर वितरित करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिकेला सिरमकडून 1,39,500 डोज उपलब्ध झालेले आहेत.

मुंबईतील सर्व महत्त्वाच्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Read all latest marathi news from mumbai

मुंबईमध्ये सुरवातीला तीन टप्प्यांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केलं जाणार आहे. 

first batch of corona vaccine made by serum institute reached mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first batch of corona vaccine covishield made by serum institute reached mumbai