पहिल्या अर्थसंकल्पात मालमत्ता करमाफी अशक्‍य? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प या महिन्यात स्थायी समितीला सादर होणार आहे. त्यात मुंबईसाठी कोणतेही नवे प्रकल्प जाहीर करण्यात येणार नाहीत. त्यामुळे मालमत्ता कर माफ करण्याचे शिवसेनेने दिलेले आश्‍वासन या अर्थसंकल्पात पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 40 हजार कोटींवर पोहचण्याची शक्‍यता आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात हा अर्थसंकल्प 37 हजार कोटींचा होता. अर्थसंकल्पाचा आकडा वाढणार असला तरी मुंबईतील नागरिकांना कोणताही नवा प्रकल्प मिळणार नाही. नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंतचा कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता या प्रकल्पांची कामे महापालिका आगामी आर्थिक वर्षात सुरू करील. त्यासाठी एक हजार कोटींपर्यंत तरतूद केली जाण्याची शक्‍यता आहे. गारगाई, पिंजाळ दमणगंगा या पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. पालिकेच्या रुग्णालयांचा विस्तार, प्रमुख जलवाहिन्या बदलणे, जलबोगदे असे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांनाच या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याबरोबरच 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचे वचन दिले होते. पहिल्या अर्थसंकल्पात ते पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: first budget property tax