हा आहे 'ठाकरे' मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. आज संध्याकाळी 6.30 वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला  

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पहिला प्रस्ताव हा शिवरायांच्या किल्ले रायगडाच्या संवर्धनाचा आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. याबद्दल मला अत्यंत  अभिमान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. रायगडाच्या संवर्धनासाठी उद्धव ठाकरे यांनी 20 कोटी रुपये मंजूर केलेत.  

या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मह्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात का? याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्याच्या सचिवांकडून अहवाल मागवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आम्हाला शेतकऱ्याच्या हातात पैसे पडल्याचं पाहायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. येत्या दोन ते तीन दिवसात सचिवांकडून माहिती आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या सरकारच्या कर्जमाफीवर उद्धव ठाकरे यांनी ताशेरे ओढलेत. 

दरम्यान माध्यमांनी ज्याप्रकारे सहकार्य केलंय त्याप्रकारे येत्या काळात देखील करावं असंही उद्धव ठाकरे  म्हणालेत.  

WebTitle : first decision of thackeray cabinet allots 20 crore for the conservation of raigad fort

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first decision of thackeray cabinet allots 20 crore for the conservation of raigad fort