पहिली ते आठवीपर्यंत यंदाही मोफत पाठ्यपुस्तके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना यंदाही मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत. या दिवशी शाळांनी पुस्तक दिवस साजरा करावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी यंदापासून समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहेत. पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती या संस्थेमार्फत करण्यात येते. शाळा सुरू होण्यापूर्वी पालक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची शक्‍यता असल्याने शाळांनी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याबाबतची सूचना शाळेच्या दर्शनी भागात ठळकपणे लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

Web Title: first to eight class free books