सिरो सर्व्हेचे निष्कर्ष : झोपडपट्टी भागात ज्येष्ठ नागरिक ठरताहेत कोरोनाचे लक्ष्य...

भाग्यश्री भुवड
Friday, 31 July 2020

कोरोना बाधितांमध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण 62.6 टक्के

मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जेष्ठ नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. मात्र, या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे, झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक कोरोनाने संसर्गित होत आहेत. कोरोना बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण 62.6 टक्के आहे. तर, रहिवासी इमारतीतील 12.6 टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मुंबईत केलेल्या सिरो सर्व्हेच्या निरीक्षणातून, झोपडपट्ट्यांमधील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक संसर्गात आले आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या 4,234 झोपडपट्टीत राहणाऱ्यांपैकी 12-24 वयोगटातील 56.1 टक्के, 25 ते 40 वयोगटातील 52.9 टक्के, 41 ते 60 वयोगटातील 59.6 आणि 60 वयोगटापुढील लोकांमध्ये 62.6 टक्के अँटीबॉडीज विकसित झाली. 

मोठी बातमी -  गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी; आता मॉलमध्ये विनामूल्य प्रवेश नाही...

मुंबईच्या सिरो सर्व्हेक्षणातून, झोपडपट्टीतील ज्येष्ठ नागरिकांना सार्स-कोविड -2 चा सर्वाधिक संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. तर, झोपडपट्टीत न राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कमीतकमी व्हायरसची लागण झाली आहे. 

झोपडपट्ट्यांमध्ये राहत नसलेल्या 2,702 लोकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यात 12 ते 24 वयोगटातील 18.8 टक्क्यांनी अँन्टीबॉडी विकसित झाल्या आहेत. 25 ते 40 वयोगटातील 15.8 टक्के, 41ते 60 वयोगटातील 15.9 टक्के आणि 60 वयोगटावरील 12.6 टक्के लोकांच्या शरीरात अँन्टीबॉडी विकसित झाल्या होत्या. 

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्येष्ठ नागरिकांनी घरीच राहणे गरजेचे आहे. अहवालात झोपडपट्टीत राहत नसलेल्या, सुशिक्षित आणि जागरूक ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त खबरदारी घेतली आणि त्यांना कोरोनाचा कमी संसर्ग झाल्याचे आढळले. झोपडपट्टीत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक शौचालय वापरावी लागतात. त्यामूळे, सोशल डीस्टस्टींग पाळणे कठीण होते. मात्र, झोपडपट्ट्यांमध्ये प्रतिकारशक्तीच्या पातळीवर मोठी वाढ झाली आहे ही आनंदाची बाब आहे. असं राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणालेत.

INSIDE STORY : तुमच्या, माझ्या मुलांच्या शिक्षण पद्धतीत ३४ वर्षानंतर झालेला आमूलाग्र बदल नेमका कसा आहे, जाणून घ्या सोप्या भाषेत...

नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ. जयंती शास्त्री म्हणाल्या, “ हा योगायोगही असू शकेल. मात्र, वयानुसार कोणताही संबंध लावणं आता कठीण आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. दुसऱ्या सिरो सर्वेक्षणानंतर या सर्वेक्षणाचे विश्लेषण केल्यावर योग्य तो निष्कर्ष काढू शकतो.

जुलै महिन्याच्या दोन आठवड्यात पालिका, टीआयएफआर आणि नितीआयोग यांनी संयुक्तपणे केलेल्या सिरो सर्वेक्षणात झोपडपट्टीमध्ये झोपडपट्ट्या नसलेल्या ठिकाणांपेक्षा 3.5 पटीने जास्त सेरोचे प्रमाण दिसून आले.

  • माटुंगा (एफ उत्तर) येथे 3,327 नमुने गोळा केले गेले होते. त्यात झोपडपट्टीतील 57.8 टक्के लोक कोरोना संसर्गात आले होते आणि त्यांच्यात अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या.

हेही वाचा : मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

  • चेंबूर (एम-वेस्ट) मध्ये 2,460 नमुने घेण्यात आले. त्यात झोपडपट्ट्यांमधील 56.7 टक्के आणि झोपडपट्टी नसलेल्या 15.6 टक्के सिरो प्रिव्हीलंन्स आढळला.
  • दहिसर (आर-उत्तर) येथे 1,149 नमुने गोळा केले. त्यात झोपडपट्ट्यांमध्ये 51 टक्के आणिझोपडपट्ट्या नसलेल्या ठिकाणी 11.4 टक्के सिरो प्रिव्हीलंन्स इतका नोंद केला गेला जो तिन्ही प्रभागांपेक्षा सर्वात कमी आहे. 

10 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसर्‍या सिरो सर्वेक्षणात कोविड -19 चे संक्रमण आणि मृत्यू दरम्यान जेंडर कोणती भूमिका बजावेल याबद्दल अधिक अभ्यास केला जाईल. 

दरम्यान, हा फक्त एक ट्रेंड आहे. अहवाल सर्व बाजुंनी निश्चित झाला पाहिजे. दुसऱ्या सिरो सर्व्हेक्षणात जो मोठ्या पातळीवर केला जाईल. त्यात खरा निष्कर्ष काढला जाऊ शकतो असं कोरोना मृत्यू निरीक्षण समिती प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणालेत. 

( संकलन - सुमित बागुल )

first phase of sero survey shows that senior citizens are more prone to get covid 19 virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first phase of sero survey shows that senior citizens are more prone to get covid 19 virus