पहिल्याच पावसात नवी मुंबईची दैना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

नवी मुंबई -  सोमवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसात नेरूळ येथे विजेचा खांब व नवी मुंबईत इतर ठिकाणी चार झाडे कोसळली. तसेच काही कालावधीकरिता वीजही खंडित झाली होती. 

नवी मुंबईत सोमवारी रात्री 10 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे नेरूळ, सेक्‍टर 16 येथील न्यू मंगलमूर्ती सोसायटीसमोरील पदपथावरील विजेचा खांब रस्त्यावर कोसळला. वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता परिसरातील तरुणांनी बांबूच्या मदतीने तो पदपथावर ठेवला. स्थानिक लोकप्रतिनिधी रवींद्र भगत यांनी याबाबत विद्युत विभागाकडे तक्रार केली. 

ऐरोलीत दोन ठिकाणी; तर बेलापूर व नेरूळ येथे प्रत्येकी एक झाड पडल्याचे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले. कोपरखैरणे व इतर काही ठिकाणी जोराच्या वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर 15-20 मिनिटांसाठी वीज खंडित झाली होती. 

वायफाय राऊटर उडाले 
सोमवारी रात्री पावसादरम्यान कडाडणाऱ्या विजांमुळे नवी मुंबईतील अनेक घरांतील वायफाय राऊटर बंद पडल्याचे निदर्शनास आले. 

आपल्या जवळच्या परिसरात विजा कोसळतात तेव्हा त्या परिसरातील सर्व विद्युत वा तत्सम वाहिन्यांमध्ये ऊर्जेचा भार आपोआप वाढतो. वायफाय राऊटर किंवा संगणक अशा प्रकारच्या ऊर्जेला लगेच आकर्षित करतात. परिणामी अशा उपकरणात विद्युत भार कल क्षमतेपेक्षा अधिक वाढून त्यात बिघाड होतो. 

सोमवारी रात्री आलेल्या पावसासोबत मोठ्या प्रमाणात विजा कडाडत होत्या. त्यामुळे अनेक घरांतील वायफाय बंद पडले. आमच्याकडे काल रात्रीपासून वायफाय बंद पडण्याच्या तक्रारी येत आहेत, अशी माहिती "आयऑन' या इंटरनेट कंपनीतील कर्मचारी संदीप इंगोले यांनी दिली. पावसाळ्यात विशेषतः वादळी परिस्थिती असल्यास किंवा विजा चमकत असल्यास वायफाय राऊटर बंद करून ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first rain in navi mumbai