ठाण्यात पहिले 'स्मार्ट' न्यूजपेपर स्टॉल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे "स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूजपेपर स्टॉल' या संकल्पनेवर ठाणे शहरात "स्मार्ट न्यूजपेपर' स्टॉल उभारण्यात आला आहे. ठाण्यातील या पहिल्यावहिल्या स्टॉलचे उद्‌घाटन आज भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाणे : ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे "स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूजपेपर स्टॉल' या संकल्पनेवर ठाणे शहरात "स्मार्ट न्यूजपेपर' स्टॉल उभारण्यात आला आहे. ठाण्यातील या पहिल्यावहिल्या स्टॉलचे उद्‌घाटन आज भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जीवन डफळे, संजय पावशे, राजीव धावरे, अजय उतेकर, संतोष पाडावे, सिद्धेश चव्हाण, असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, दिलीप चिंचोली, वैभव म्हात्रे, भरत कुथे, गणेश शेडगे उपस्थित होते. 

ऊन, पाऊस, वारा यांपासून वृत्तपत्र विक्रेत्याला संरक्षण मिळेल, या हेतूने हा स्टॉल बनवण्यात आला आहे. या स्टॉलच्या खाली एक छोटेखानी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात पेपर तसेच इतर सामान ठेवता येणार आहे. ठाणे महापालिकेने या स्टॉलला परवाना दिलेला आहे. आता या स्टॉलवर वृत्तपत्र विक्रेते जाहिरातीही स्वीकारतील आणि त्यातून त्यांना अधिक मोबदलाही मिळणार आहे.

यापुढे स्टॉलवर कुरिअरचे पिकअप आणि ड्रॉप पॉईंट सुरू करण्याचे नियोजन आहे. येणाऱ्या काळात ठाण्यातील सर्व स्टॉल हे एकाच प्रकारचे असतील. त्यामुळे या स्टॉलची एक वेगळी ओळख निर्माण होईल. वृत्तपत्र विक्रेते आता महिन्याची पेपरची बिले घेण्यासाठी ऑनलाईन मोबाईल ऍपचासुद्धा वापर करणार आहेत आणि ऑनलाईन ट्रांन्झॅक्‍शन करतील, अशी माहिती ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दिली. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First 'Smart' Newspaper Stall in Thane