"मी रिकाम्या बाकांशी लढणारा माणूस नाही, मी शत्रूला अंगावर घेणारा माणूस" - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

विधानसभेत बहुमत चाचणी पार पडल्यानंतर आज सभागृहात उद्धव ठाकरे यांनी ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे मनोगतात व्यक्त करताना ज्यांची शपथ घेऊन आपण का कारभार स्वीकारला त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र उभा करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय केलाय.  

विधानसभेत बहुमत चाचणी पार पडल्यानंतर आज सभागृहात उद्धव ठाकरे यांनी ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे मनोगतात व्यक्त करताना ज्यांची शपथ घेऊन आपण का कारभार स्वीकारला त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र उभा करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय केलाय.  

काय म्हणालेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मी पहिल्यांदाच आज सभागृहात आलो, सभागृहात येणं हे माझं भाग्य आहे. आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या शिवरायांचा जन्म ज्या मातीत झाला त्या मातीतील शिवरायांचे आम्ही भक्त आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.   

आज या सभागृहात आल्यावर थोडं दडपण होतं, वागायचं कसं ? मी मैदानातील माणूस आहे, वैधानिक कामकाजाचा मला अनुभव नाही, इथे आल्यावर असं वाटलं मैदानात जास्त बरं असतं. आज मी रिकाम्या बाकांशी काही लढणार नाही. कारण मोकळ्या बाकांशी मी तलवारबाजी करणार नाही. मी समोरासमोर लढणारा आहे, शत्रूला अंगावर घेणारा माणूस आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.     

मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, मी माझ्या आई वडलांच्या नावाची शपथ घेतली. हा जर गुन्हा असेल तर मी तो एकदा नाही प्रत्येक जन्मात करीन. ज्यांची शपथ घेऊन आपण हा कारभार सुरु करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तो घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही पुन्हा एकदा शपथ घेतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

WebTitle : first speech of chief minister uddhav thackeray in vidhansabha


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first speech of chief minister uddhav thackeray in vidhansabha