मोखाड्यात प्रथमच मोहीते महाविद्यालयात पदवीदान दीक्षांत समारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

तालुक्यात प्रथमच पदवीदान दीक्षांत सोहळा प्रदान करण्याची प्रथा मोहीते महाविद्यालयाने सुरू केली आहे.

मोखाडा -  मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहीते महाविद्यालयात पदवीदान दीक्षांत समारंभ, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू व्ही. एन. मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच पदवीदान दीक्षांत सोहळा प्रदान करण्याची प्रथा मोहीते महाविद्यालयाने सुरू केली आहे. या सोहळ्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक अॅड. देविदास पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रमणी मोहीते, पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रल्हाद कदम, प्राचार्य डॉ. सुधाकर गवंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रतिकूल परिस्थिती वर मात करून, मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावचे सुपुत्र डाॅ. चंद्रमणी मोहीते यांनी आपली नोकरी सांभाळून खोडाळ्यात मुरलीधर नानाजी मोहीते महाविद्यालय उभारले आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्याची शैक्षणिक अडचण या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे दुर झाली आहे. या महाविद्यालयाचा प्रथम पदवीदान दीक्षांत सोहळा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला आहे. या सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डाॅ. व्ही. एन. मगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कलाशाखेतील 28, वाणिज्य शाखा 11 आणि व्यवस्थापन शाखेतील 6 उत्तीर्ण विद्यार्थ्याना पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

यावेळी उपकुलगुरू मगरे यांनी येथील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चंद्रमणी मोहीते यांनी महाविध्यालय सुरू केले. तशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण पदवीधर झाल्याने संस्था चालक व विद्यार्थ्याचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले आहे. यावेळी सोहळ्यास स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार भगवान खैरनार, विजय येलमामे, हसन शेख, ऊमेश येलमामे, बाबुराव दिघा यांसह महाविद्यालयाचे सचिव प्रा. दीपक कडलग, शिंगवे, काशिद सर व विद्याथीॅ उपस्थित होते.    

Web Title: For the first time the graduation convocation ceremony in Mohit College