दशकभरात मुंबईत प्रथमच फटाक्‍यांचा आवाज कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

'आवाज' संस्थेचे सर्वेक्षण; वेळेची मर्यादा मात्र झुगारली
मुंबई - दशकभरात प्रथमच मुंबईत दिवाळीतील फटाक्‍यांचा आवाज कमी असल्याचे दिसून आले आहे. "आवाज' या स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) सर्वेक्षणातून हा निष्कर्ष निघाला आहे. फटाक्‍यांचा आवाज कमी असला, तरी रात्री 10पर्यंतच फटाके फोडण्याचे बंधन मुंबईतील अतिउत्साही नागरिकांनी झुगारल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

गेल्या 13 वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या "आवाज'च्या प्रमुख सुमैरा अब्दुलाली यांनी दिवाळीच्या दिवसांत शहर व उपनगरांत सर्वेक्षण केले. रात्री 10 पर्यंतच फटाके फोडावेत, असे बंधन मुंबई पोलिसांनी घातले आहे. तरीही चेंबूर, मरीन ड्राइव्ह, वरळी, शीव, जुहू व खार परिसरात रात्री 10 नंतरही फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात येत आहे. "आवाज'ने केलेल्या सर्वेक्षणात वेळेची मर्यादा मुंबईकरांनी ओलांडली; पण दशकभराच्या तुलनेत यंदा फटाक्‍यांचा डेसिबल आवाज तुलनेने कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. "मरीन ड्राइव्ह येथे 113.5 डेसिबल आवाजाची नोंद झाली. गेल्या वर्षी हाच आकडा 123.1 डेसिबल नोंदला गेला होता. आतापर्यंतची आकडेवारी पाहता आवाज नक्कीच कमी आहे. जनजागृती झाल्यामुळे हे शक्‍य झाले. त्यात मुलांचा सहभागही कौतुकास्पद आहे,' असे अब्दुलाली यांनी सांगितले.

'आवाज'चे सर्वेक्षण
वेळ ठिकाण डेसिबल
8.30 ते 8.45 वा. वरळी सी-फेस 90
8.55 वा. वरळी नाका 99.5
9.04 वा. के.ई.एम. रुग्णालयासमोर 101 (शांतता क्षेत्र)
9.30 वा. मरीन ड्राइव्ह 111.7 ते 113.5
12.20 वा. वरळी सी-फेस 85 ते 90

Web Title: first time in Mumbai crackers noise reduction