उल्हासनगरात प्रथमच पालिकेची कॅन्टीग महिला चालवणार

दिनेश गोगी
गुरुवार, 10 मे 2018

उल्हासनगर महानगरपालिकेची कॅन्टीन यापुढे महिला बचत गटाने चालवावी. असा महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेचा उद्या शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. मात्र कॅन्टीनचे वार्षिक भाडे तब्बल 1 लाख 94 लाख रुपये ठेवण्यात आल्याने "हा महिलांचे सक्षमीकरण की त्यांचे खच्चीकरण" असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

उल्हासनगर - उल्हासनगर महानगरपालिकेची कॅन्टीन यापुढे महिला बचत गटाने चालवावी. असा महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेचा उद्या शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. मात्र कॅन्टीनचे वार्षिक भाडे तब्बल 1 लाख 94 लाख रुपये ठेवण्यात आल्याने "हा महिलांचे सक्षमीकरण की त्यांचे खच्चीकरण" असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

शिवसेनेसोबत विरोधीपक्षात असलेल्या काँग्रेस नगरसेविका अंजली साळवे यांनी तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना पालिकेची कॅन्टीन चालवण्यास द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. बचतगट शाळांना, अंगणवाड्यांना अल्पोहार पुरवतात. तसेच, लहान सहान गृहउद्योग करतात. असे लक्ष देखील निवेदनात वेधण्यात आले होते. या मागणीला निंबाळकर यांनी हिरवा कंदील दाखवला होता. निंबाळकर यांच्या बदलीनंतर कॅन्टीनची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या महिला बचत गटाला कॅन्टीनचा ठेका हवा त्यांनी पालिकेकडे निविदा शुल्क एक हजार रुपये व अनामत रक्कम पाच हजार रुपये भरायचे आहेत. 14 मे रोजी ह्या निविदा उघडण्यात येणार आहेत.

Web Title: first time in Ulhasnagar, the women will run umc cantine