माशांना महागाईची फोडणी 

राेहा बाजारात मासे खरेदी करताना ग्राहक.
राेहा बाजारात मासे खरेदी करताना ग्राहक.

रोहा : वादळी वाऱ्यामुळे बंद असलेली मासेमारी, गौरी-गणपती विसर्जनानंतर वाढलेली मागणी आदी कारणांमुळे अनेक माशांचे भाव दुपटी-तिपटीने वाढले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस बोंबीलांचा भाव प्रति किलो 100 रुपये होता. तो आता 300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पापलेट 1400, बांगडा 400 रुपये किलो भावाने विकण्यात येत आहे. 

जून आणि जुलैमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद होती. 1 ऑगस्टपासून ही बंदी उठली. यादरम्यान आवक कमी असली, तरी श्रावण महिन्यामुळे मागणी नसल्याने किरकोळ बाजारात बोंबील 100; तर पापलेट 500 रुपये प्रति किलो भावाने विकण्यात येत होते. इतर माशांचे भावही उतरले होते. मात्र 20 ऑगस्टपासून हवामान खराब असल्याने मासेमारी ठप्प झाली. त्यामुळे आवक खूपच कमी झाली. आता गौरी-गणपतीचे विसर्जन झाले असल्याने मागणीही वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बोंबील 300 ते 400 रुपये प्रति किलोने; तर पापलेट 1 हजार 200 ते 1 हजार 500 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. इतर माशांच्या किमतीही दुप्पट-तिप्पट वाढल्या आहेत. 

दिघी बंदरात बोंबील 150 ते 200 रुपये प्रति किलो घाऊक भावाने विकण्यात येत होते; तर पापलेटचा भाव 800 ते 900 रुपये किलो होता, असे दिघी येथील व्यावसायिक संगीता गुणाजी यांनी सांगितले. 

घाऊक बाजारातही मासळी महाग 
मुंबईत कुलाबा येथे किनारी भागातील मच्छीमार हेमंत कोळी यांनी सांगितले की, बोंबलाचा घाऊक भाव 120 ते 150 रुपये प्रति किलो होता; तर पापलेट 600 ते 900 रुपये प्रति किलो भावाने विकण्यात येत होते. 
 
घाऊक बाजारातही मासळी महाग 
मुंबईत कुलाबा येथे किनारी भागात मासेमारी करणारे हेमंत कोळी म्हणाले, की काल (ता. 10) बोंबलाचा घाऊक भाव 120 ते 150 रुपये प्रति किलो झाला होता; तर पापलेट 600 ते 900 रुपये प्रति किलोने बंदरावर विकले गेले. 

महागाईचा चटका वाढणार 
शनिवारी 14 सप्टेंबर रोजी पौर्णिमा असून त्याच दिवशी श्राद्ध पक्ष सुरू होत आहे. या पंधरवड्यात पितरांना भोजन देऊन श्राद्ध घालण्याचा रिवाज आहे. त्यामुळे या पंधरवड्यात मागणी वाढून मासे आणखी महाग होण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी वर्तवली. 
 
खराब हवामानामुळे मासेमारी बंद असल्याने आवक घटली आहे. श्रावण संपून गौरी-गणेशाचे विसर्जनही झाले आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. या दोन्ही कारणांनी मासळीचे भाव वाढले आहेत. 
- दिनेश कोटकर, मासेविक्रेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com