मुंबई विद्यापीठाला पाच कोटींचा निधी

मुंबई विद्यापीठाला पाच कोटींचा निधी

मुंबई - मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनातून उद्योगनिर्मितीसाठी लवकरच व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नवसंकल्पनांना वाव देत नवे उद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात इन्क्‍युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून विद्यापीठाला पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

स्टार्टअप धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाने विस्तृत योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यापीठाने ऊर्जेचा पुनर्वापर, पॉलिमर्स आणि मॅग्नेटिक मटेरिअल, बायोटेक्‍नॉलॉजी, फार्मासिटिक्‍यूल, फिनटेक, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांची निवड केली आहे. विद्यापीठाच्या ग्रीन टेक्‍नोलॉजी या इमारतीमध्ये सुमारे दहा हजार स्वेअरफुटांच्या क्षेत्राफळात इन्क्‍युबेशन सेंटरची उभारणी केली जाणार आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांमध्ये उद्योजकता संस्कृती वाढवणे, विशिष्ट क्षेत्रे आणि डिझाईन उत्पादनांमधील विकास प्रक्रिया सुरू करणे, आर्थिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विद्यापीठाचा भर असणार आहे. 

संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ आणि सहयोगींमध्ये क्रॉस-नेटवर्किंगद्वारे औद्योगिक संकल्पना वाढीस लावण्यास मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यापीठाकडे ६० कोटींचे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांचे १५० हून अधिक पेटंट आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संकल्पना, तसेच आविष्कारातून उदयास येणाऱ्या विविध संकल्पनांना या इन्क्‍युबेशन सेंटरमुळे मूर्त स्वरूप मिळणार आहे. नव उद्योगांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. सेंटरसाठी लवकरच विद्यापीठातर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. 

मुंबई विद्यापीठाचा हा नवा उपक्रम आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि नवसंशोधकांना त्यांच्या उद्योगनिर्मितीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, मेड इन इंडियाच्या अनुषंगाने नव उद्योजकांमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी विद्यापीठाने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. 
- प्रा. सुहास पेडणेकर,  कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com