पाच जणांचा अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबई - नव्या वर्षाच्या सुरवातीला रविवारी (ता. 1) वांद्रे, गोरेगाव, ईस्टन फ्री वे आणि माहूल येथे झालेल्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. 

कुर्ला येथील रहिवासी शादाब शेख हा मित्र झिशान खानसोबत दुचाकीने वांद्रे परिसरात आला. तेथील यू टर्न उड्डाण पुलावर झिशानचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो पुलावरून खाली कोसळला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. 

अंधेरीतील डी. एन. नगरमधील नवीन नंदाधर अण्णपर्थी याचा गोरेगावच्या एसआरपीएफ ग्राउंड येथील गेटजवळ दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. तो नाताळसाठी बंगळूरहून मुंबईत आला होता. या अपघातात मानव जैन हाही जखमी झाला आहे. 

माहूल रोड येथे विचित्र अपघात झाला. माहुल रोड येथे पाच पादचाऱ्यांना दुचाकीस्वाराने धडक दिल्याने सोमनाथ गौड याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला. विशेष म्हणजे ईस्टर्न फ्री वेवर दुचाकी नेण्यास बंदी आहे. 

Web Title: five dead in accident