नक्षलींशी संबंध असणाऱ्या पाच जणांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - नक्षलवादी चळवळीशी संबंध, नक्षली विचारधारेचा प्रसार करून तरुणांना या चळवळीत ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या पाच जणांना विशेष सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. अजय दत्री ऊर्फ कृष्णा ऊर्फ वेणुगोपालन, सत्यनारायण राजाजिया कारिया, नरसिया लष्कमिया झुमुपाला, शंकर लिंग्गया झुंडे आणि रवी राज्जना मरामपल्ली अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल झाले नसल्याने हे पाचही जण जामिनास पात्र होतात, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्या. डी. एस. देशमुख यांनी त्यांना प्रत्येकी वैयक्तिक 50 हजार रुपयांचा; तसेच एक किंवा दोन खात्रीदायक हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

Web Title: Five people related to the Naxalites have been granted bail