पाच कीटकनाशकांवर अमरावतीत तूर्त बंदी

Anil-Bonde
Anil-Bonde

मुंबई - कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच कीटकनाशकांची पुढील दोन महिन्यांसाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. जिल्ह्यात नमूद कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ही कीटकनाशके अति विषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजूर यांवर उपचार सुरू असल्याचेही कृषिमंत्री डॉ.  बोंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com