पाच आरटीओ दलालांना ठाण्यामध्ये अटक

पाच आरटीओ दलालांना ठाण्यामध्ये अटक

ठाणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कारभार खासगी दलाल हाताळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील मर्फी येथील कार्यालयात बेकायदा प्रवेश करून पाच व्यक्ती अभिलेख हाताळण्याबरोबर येथील संगणकावर काम करत असल्याचे आरटीओच्या दक्षता पथकाने उघडकीस आणले.

या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे परिक्षेत्रात सेंट्रल जेलनजीक आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील मर्फी कंपनीजवळ आरटीओची दोन कार्यालये आहेत. या दोन्ही कार्यालयांना कायम दलालांचा विळखा असतो. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर धाबे दणाणलेल्या दलालांनी कार्यालय परिसरातून गाशा गुंडाळला होता. शुक्रवारी (ता. ३) आरटीओच्या दक्षता पथकाने अचानक मर्फी कार्यालयाला भेट दिली. तेव्हा, पाच व्यक्ती कार्यालयात अभिलेख हाताळताना आढळल्या. त्यातील काही जण संगणकावरही काम करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com